Prof. Nilesh Kad, a son of Buldhana, stole the show on stage at the folk festival.: सांस्कृतिक महाकुंभाने रसिक भारावले ‘लोकोत्सवात’ बुलढाण्याचे सुपुत्र प्रा. निलेश कड यांनी गाजवले व्यासपीठ

छत्रपती संभाजीनगर:
सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत ‘लोकोत्सव’ सोहळा नुकताच तापडिया नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन्ही राज्यांच्या संस्कृतीचा सुरेख संगम या महोत्सवात पाहायला मिळाला.

१८ मार्च रोजी झालेल्या ‘लोकसंस्कृतीचा लोकोत्सव’ या विशेष सत्रात आरती क्रिएशन आणि गंध मराठी मातीचा समूहाने विविध लोकनृत्ये सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रा. निलेश कड. त्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने संपूर्ण नाट्यगृह दणाणून सोडले आणि रसिकांची भरभरून दाद मिळवली.
या तीन दिवसीय महोत्सवाला (१६ ते १८ मार्च) प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मराठमोळ्या लोककलांचे वैभव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


