mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मुंबईत वंचितचे आज आंदोलन : Protest of the deprived in Mumbai today

शेअर करा :

Protest of the deprived in Mumbai today : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २ मार्च रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर निदर्शने करण्यात येणार आहे.

Protest of the deprived in Mumbai today

निदर्शनामध्ये सहभागी होण्याचे नीलेश जाधव यांचे आवाहन
मोताळा : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २ मार्च रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केले आहे.
एपस्टीन फाईलमुळे अमेरिकेसोबत झालेला व्यापारी करार आणि राफेल खरेदी करार यासंदर्भात अनेक संघटनांकडून विचारणा करण्यात येत आहे की, एपस्टीन फाईल काय आहे? याचा खुलासा करावा जेणेकरून अजून लोकांना सविस्तर कळेल, असे वंचितने म्हटले आहे.
अमेरिकेसोबत केलेला करार हा फक्त कृषी क्षेत्रासाठी नाही, तर भारताला गुलाम म्हणून अमेरिकेने ठेवलेले आहे.
विदेश नीती, अर्थ नीती, आरोग्य नीती असेल या सर्व अमेरिका ठरवणार आणि भारत त्यावर अंमल करणार, त्यामुळे देशाला गहाण ठेवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केल्याचा आरोप नीलेश जाधव यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देश विकण्यापासून वाचविण्यासाठी मुंबईत हे आंदोलन करण्यात येत आहे. तमाम जनतेने या निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन नीलेश जाधव यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top