Rajshree Ubale passed with first class in classical singing : नोव्हेंबर- डिसेंबर २०२५ या सत्रातील गायन, वादन व नृत्य या विषयांचा निकाल नुकताच घोषित झाला. यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी राजश्री उबाळे शास्त्रीय गायन विषयात प्रारंभिक परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या.

बुलढाणा : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या नोव्हेंबर- डिसेंबर २०२५ या सत्रातील गायन, वादन व नृत्य या विषयांचा निकाल नुकताच घोषित झाला. यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी राजश्री उबाळे शास्त्रीय गायन विषयात प्रारंभिक परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या.
राजश्री उबाळे या बुलढाणा जिल्हा परिषद येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्या एक मधुर व दमदार आवाजाच्या गायिका म्हणून सुपरिचित आहेत. त्या सध्या स्वरविहार संगीत विद्यालयांमध्ये नियमित शास्त्रीय गायनाचे धडे घेत असून त्यांना या परीक्षेसाठी स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह जिल्हा परिषदेमध्ये तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

