Ram Navami Festival Celebrated with Great Enthusiasm : भव्य उत्साहात रामनवमी उत्सव साजरा रामराज्य प्रतिष्ठान, सागवनच्या वतीने शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

बुलढाणा :
सागवन येथे रामराज्य प्रतिष्ठान सागवन च्या वतीने रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावात आनंदाचे व धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शोभायात्रेत भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या शोभायात्रेत गावातील महिला, पुरुष, युवक, तसेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तर युवकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
रामभक्तांच्या उपस्थितीने आणि एकजुटीने साजरा झालेला हा उत्सव सागवन गावाच्या सांस्कृतिक ऐक्याचे आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक ठरला.


