mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

ब्लॅकमेलींग करून वारंवार बलात्कार : Repeated rape through blackmail

शेअर करा :

Repeated rape through blackmail : ब्लॅकमेलींग करून वारंवार बलात्कार पतीसह मुलांना मारण्याच्या धमक्या.

Repeated rape through blackmail

 

अंढेरा : जबरदस्तीने बलात्कार करतानाचा व्हिडीओ काढून नंतर तो व्हायरल करण्याच्या धमक्या देत एका महिलेवर मेरा खुर्द येथील आरोपी शादाब खान याने वेळोवेळी बलात्कार केला. लैंगिक अत्याचार वाढत गेल्याने पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार, ॲट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील रहिवासी शादाब खान सखावत खान याने महिलेचे लैंगिक शोषण केले. या आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ६४, १२६ (२), ३५१ (२), सहकलम ३ (१), (आर), (एस), ३ (२) (व्हीए), ३ (२) (५), ३ (१) (डब्ल्यू)(१)(२) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अनधिनियम १९८९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी २५ वर्षीय पीडित महिला वर्षभरापूर्वी शेतात एकटी जात असताना आरोपीने तिचा फोटो मोबाइलमध्ये काढला. त्याला जाब विचारला असता आरोपी दुचाकीवर बसून निघून गेला. दुसऱ्या दिवशी शेतात जाताना आरोपीने जबरदस्तीने अडवून बलात्कार केला. त्याची चित्रफित मोबाइलमध्ये बनवली. तो व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत महिलेला त्याने ब्लॅकमेल करून अनेकदा बलात्कार केला. तसेच पती व मुलांना जीवे मारून टाकेन, अशाही धमक्या आरोपीने दिल्या. धमक्या देऊन ब्लॅकमेल करीत वारंवार लैंगिक शोषण होत असल्याने अखेर महिलेने पोलिसांत तक्रार दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top