mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रिपाइंने न.प.समोर वाजविले डफडे : Ripa played drums in front of the N.P.

शेअर करा :

Ripa played drums in front of the N.P. : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने नगर परिषद प्रशासनासमोर २ एप्रिलरोजी ‘डफडे बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

Ripa played drums in front of the N.P.
निवेदन देताना रिपाइंचे पदाधिकारी

खामगावातील पेट्रोलपंपाचे नियमबाह्य काम थांबविण्याची मागणी

खामगाव : खामगाव-चिखली रोडवरील जम जम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या नियमबाह्य पेट्रोलपंपाचे काम तत्काळ बंद करा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने नगर परिषद प्रशासनासमोर २ एप्रिलरोजी ‘डफडे बजाओ’ आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यात आला.

नियमांना बगल देऊन पेट्रोल पंपाचे केले जात असल्याचा आरोप रिपाइंने केला आहे. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे महासचिव निळकंठ सोनोने यांनी यापूर्वीच नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. जर प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन काम बंद पाडले नाही, तर २ एप्रिल रोजी डफडे बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दुपारी निळकंठ सोनोने यांच्या नेतृत्वात रिपाइं कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयावर धडकले. नियमबाह्य काम करणाऱ्यांचे लाड थांबवा आणि जनतेच्या सुरक्षिततेशी खेळू नका, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आंदोलनानंतर मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पेट्रोलपंपाच्या बांधकामाची तांत्रिक तपासणी करून ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात रिपाइंचे पदधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top