Robbery of farm houses : बायगाव बुद्रूक शेतशिवारात चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून महिलांच्या अंगावरील सोन्या – चांदीचे दागिने लुटले. चाकूने केलेल्या शेतकरी जखमी झाला. तसेच इतरांच्या चाकू गळ्याला लावून, धाक दाखवत लुटमार करण्यात आली.

देऊळगाव राजा : तालुक्यातील बायगाव बुद्रूक शेतशिवारात चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून महिलांच्या अंगावरील सोन्या – चांदीचे दागिने लुटले. चाकूने केलेल्या शेतकरी जखमी झाला. तसेच इतरांच्या चाकू गळ्याला लावून, धाक दाखवत लुटमार करण्यात आली. महिलांच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने असा ५ लाख ३० हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. मंगळवार, १७ मार्च व १८ मार्चच्या पहाटे दरोड्याचा हा थरार घडला.
बायगाव बुद्रूक येथील रहिवासी दत्तु विष्णू खरात (वय ६४) हे शेतात राहतात. त्यांच्या बाजूने शिवनारायण भगवान ताकतोडे व भारत ताकतोडे हे दोघे भावंडे राहतात. गव्हाची मळणी केल्याने शिवनारायण ताकतोडे व त्यांची पत्नी सविता हे दोघे १७ मार्चच्या रात्री साडेअकरा वाजता गव्हाच्या खळ्यावर झोपलेले होते. त्यावेळी तेथे तोंड बांधलेले चार दरोडेखोर आले. शिवनारायण यांना चाकूचा धाक दाखवून पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. दरोडेखोरांनी शिवनारायण यांच्या मांडीवर व उजव्या पायाच्या पोटरीवर चाकूने वार केला. त्यांना पकडून घरांकडे नेण्यात आले. त्यांचा भाऊ भारतला आवाज द्यायला भाग पाडले. भावाने दरवाजा उघडायला लावला. दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर आई, पत्नीचे सोन्या, चांदीचे दानिगे लुटले.
त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा दत्तु खरात यांच्या घराकडे वळविला. खरात यांच्यासह पत्नी व मुलीचे एका खोलीत नेऊन चाकूचा धाक दाखविला. पत्नी व मुलीच्या अंगावरील सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी लुटले. तसेच २१ हजारांची रोख रक्कमही लुटली.
एक दरोडेखोर पडला
गावातून काही ग्रामस्थ येत असल्याचे दिसताच आरोपींनी पलायन केले. एक दरोडेखोर उडी मारताना ओट्यावरून पडला. त्याला पकडून अंढेरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले.
- लुटलेला ऐवज
- रोख ५१ हजार रुपये
- ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने,
- आठ तोळे चांदीचे दागिने
- ५ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा ऐवज


