mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सरपंचाकडून बांधकाम कामगारास मारहाण : Sarpanch beats up construction worker

शेअर करा :

Sarpanch beats up construction worker : बांधकाम कामगारास विठ्ठलवाडी येथील सरपंचाने काटेरी काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

‘तु आमचा माणूस नाही म्हणत हिणवले’ : सरपंचावर गुन्हा दाखल : विठ्ठलवाडी येथील घटना

मेहकर : बांधकाम कामगार असल्याचा अर्ज ग्रामसेवकाकडून प्रमाणित करून घेण्यासाठी गेलेल्या बांधकाम कामगारास विठ्ठलवाडी येथील सरपंचाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना १३ फेब्रुवारीला घडली. या प्रकरणी १९ फेब्रुवारीला सरपंचाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

धनराज मानसिंग राठोड असे मारकुट्या सरपंचाचे नाव आहे. मेहकर तालुक्यात व डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विठ्ठलवाडी येथील पंजाब लक्ष्मण गायकवाड (वय ४५ ) हा कामगार बांधकाम कामगार फॉर्मवर ग्रामसेवकाची सही घेण्यासाठी १३ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेला होता. यावेळी सरपंच धनराज राठोड याने ‘तु आमचा माणूस नाही, तुला सही देत नाही. तुला काय करायचे ते कर’ असे म्हणून शिवीगाळ केली तसेच खिळे असलेल्या काठीने मारहाण करीत जिवाने मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत आज पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानुसार आरोपी सरपंचाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३५१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर सोनुने करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top