mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धम्मगिरी बुद्धविहारात शिवजयंती उत्साहात : Shiv Jayanti in full swing at Buddha Vihara

शेअर करा :

Shiv Jayanti in full swing at Buddha Vihara : मलकापूर रोडस्थित धम्मगिरी बुद्धविहार येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली.

Shiv Jayanti in full swing at Buddha Vihara

विहार समिती व सम्यक समन्वय समितीतर्फे वंदन

बुलढाणा : मलकापूर रोडस्थित धम्मगिरी बुद्धविहार येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी  करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून स्वीकृत नगरसेवक सुनील सपकाळ, मोहन पऱ्हाड, अरविंद होंडे उपस्थित होते. भीमराव जाधव, आर.के. इंगळे, विद्यासागर मिसाळकर, दिलीप वाघमारे, एस.यु. बावस्कर, पी.आर. इंगळे, मंगल मिसाळ, भय्यासाहेब पाटील, बाबासाहेब जाधव, अशोक दाभाडे, विजय राऊत, संजय कस्तुरे, विजय वाकोडे, सुनील धुरंधर, सुभाष साबळे, प्रेम इंगळे, सुरेश सरकटे, मिलिंद वानखडे, प्रिन्स हिवाळे, दादाराव पगारे, झिने साहेब, अर्चना जाधव, सुजाता हिवाळे उपस्थित होत्या.
या मंगल प्रसंगी शिवरायांना अभिवादन करून प्रमुख मंडळींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिलिंद वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रेम इंगळे यांनी केले. सरनत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top