mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिखलीत शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा आता ५ एप्रिलला : Shiv Sena’s Grand Induction Ceremony in Chikhali Now on April 5th

शेअर करा :

Shiv Sena’s Grand Induction Ceremony in Chikhali Now on April 5th : चिखलीत शिवसेनेचा ‘भव्य पक्षप्रवेश सोहळा’ आता ५ एप्रिलला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्सा

Shiv Sena's Grand Induction Ceremony in Chikhali Now on April 5th

चिखली (प्रतिनिधी):

चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेला विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेना जाहीर प्रवेश मेळावा आता ५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुंबई येथे तातडीची व अति महत्त्वाची बैठक बोलावल्याने, पूर्वनियोजित असलेला हा सोहळा आता रविवारी सकाळी ११ वाजता ‘मौनी बाबा संस्थान’ येथे आयोजित करण्यात आला आहे.

​बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र, खासदार तथा केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब आणि बुलढाण्याचे लाडके आमदार धर्मवीर संजय (संजूभाऊ) गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. चिखली मतदारसंघातील विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी भगवा हाती धरून शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

​या सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, चिखली शहरप्रमुख विलास घोलप, युवासेना उपजिल्हाप्रमुख वैशालीताई कपिल खेडेकर, अमोल शिंदे, संदीप पालकर, गोपीनाथ लहाने आणि शिवाजी शिराळे यांच्यासह सर्व पदाधिकारी जय्यत तयारी करत आहेत.

​”हा सोहळा चिखलीच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल, तरी सर्व शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत व समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top