mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिवा पळत सुटला अन् पोलिसही! : Shiva ran away and so did the police!

शेअर करा :

Shiva ran away and so did the police!v : तो दडून बसला होता, चोरी करण्याच्या उद्देशाने! पोलिसांची गस्त सुरू होती. घाबरून तो पळत सुटला आणि पोलिसही त्याच्यावर मागावर धावत सुटले. अखेर संशयास्पदस्थिती वावरणारा शिवा इटे याला पोलिसांनी पकडले.

Shiva ran away and so did the police!

चोर-पोलीस खेळ रंगला
खामगाव : तो दडून बसला होता, चोरी करण्याच्या उद्देशाने! पोलिसांची गस्त सुरू होती. घाबरून तो पळत सुटला आणि पोलिसही त्याच्यावर मागावर धावत सुटले. अखेर संशयास्पदस्थिती वावरणारा शिवा इटे याला पोलिसांनी पकडले. खामगाव शहरात १२ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास चोर-पोलीस खेळ रंगला.
खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अंकुश गुरुदेव हे सहकाऱ्यांसह रात्रभरापासून गस्ती घालत होते. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ३.१० वाजता चांदमारी परिसरात चिंतामणी गणपती मंदिरासमोर एकाने पोलिसांना पाहताच धूम ठोकली. पोलिसांनीदेखील त्याला पाहिले आणि पाठलाग सुरू केला. तो गल्लीतील टपरीच्या अंधारात लपून बसला. अखेर त्याला पकडण्यात आले. उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता शिवा कैलास इटे (वय २०) असे त्याने नाव सांगितले. तो शहरातील बाळापूर फैलमधील रहिवासी आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top