mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एक तरी ठोस काम दाखवा

शेअर करा :
Show some solid work.

माजी आमदार संजय रायमूलकर यांचे विद्यमान आमदारांना आव्हान

मेहकर : मेहकर व लोणार तालुक्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ५ हजार २०० कोटींची विकासकामे मंजूर करून आणली. आमच्यावर टीका करणाऱ्या आमदार सिद्धार्थ खरात यांनी गेल्या सव्वा वर्षात एखादे तरी ठोस काम मंजूर करून आणले का,  ते त्यांनी दाखवावे, असे थेट आव्हान माजी आमदार संजय रायमूलकर यांनी दिले.

मेहकर येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रायमूलकर म्हणाले, मेहकर शहरात आम्ही ९३२ कोटींची कामे मंजूर करून आणली. यातील बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत, असे सांगून रायमूलकर म्हणाले की, सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते, सभामंडप, स्मशानभूमीची कामे याबरोबरच आरोग्य, शिक्षण, सिंचन रस्ते, बांधकाम अशी मतदारसंघात ५२०० कोटींची कामे मंजूर करून आणली. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. आम्ही मंजूर केलेल्या कामांना भेटी देऊन ती कामे जणू आपणच करत आहोत, असा आभास आमदार खरात व त्यांचे चेले चपाटे करत आहेत. आयत्या पिठावर रेघोट्याओढण्याचे काम त्यांनी बंद करावे. मेहकर शहरात दहा कोटींची प्रशासकीय इमारत, सहा कोटी रुपयांची विद्यार्थी अभ्यासिका ,पावणेचार कोटी रुपयांची पोलीस स्टेशनची इमारत, दहा कोटी रुपयांचा डीपी रोड ,सव्वातीन कोटी रुपयांचे वारकरी भवन, बालाजी मंदिरातील आठ कोटींची कामे, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक संकुलचे सहा कोटीचे काम आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराज उद्यानातील साडेआठ कोटींची विकासकामे केवळ आणि केवळ आम्हीच मंजूर करून आणली असून यातील बहुतांश कामे पूर्ण झाले आहेत, काही प्रगतीत आहेत. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार खरात व नगराध्यक्षयांनी घेऊ नये. आम्ही एक कोटी दहा लाख रुपयांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पुतळा शिवाजी उद्यानात बसविणार आहोत, असेही रायमुलकर म्हणाले.

ग्रामीण भागातले सर्व रस्ते आम्ही दर्जेदार बनविले आहेत. सर्व गावांमध्ये विविध विकास कामे केली आहेत. तरीही मतदारसंघ भकास करून ठेवल्याचा आरोप विरोधक करत आहेत, हे चुकीचे आहे, असेही संजय रायमूलकर म्हणाले.
           
            मेहकर नगरपालिकेत नगराध्यक्ष विरोधी पक्षाचा असला तरी काँग्रेस आणि शिवसेनेचे मिळून २० नगरसेवक आहेत. त्यांचेकडे फक्त सहा आहेत. त्यामुळे बहुमतानेच इथे निर्णय होतील ही काळया दगडावरची रेघ आहे, असेही रायमुलकर म्हणाले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व बांधकाम सभापती सुरेशतात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठिया, प्रा. विनोद पह्राड, अमोल कंकाळ, बाजार समितीचे उपाध्यक्ष विलास मोहरुत, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे   उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top