mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

स्मार्ट मीटर आले हो, विज बिल नाही भरले तर पुरवठा खंडित : Smart meters have arrived, if electricity bill is not paid, supply will be cut off

शेअर करा :

Smart meters have arrived, if electricity bill is not paid, supply will be cut off : स्मार्ट मीटर आले हो, विज बिल नाही भरले तर पुरवठा खंडित.

Smart meters have arrived, if electricity bill is not paid, supply will be cut off

                     राज्यात २  लाख ४५  हजार स्मार्ट मीटर चे विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट होणार.

डोणगाव : विज बिल नाही भरले तर वर्षभरात किंवा सहा महिन्यांमध्ये विद्युत कनेक्शन कापले जायचे  मात्र अत्ता हे भूतकाळ ठरणार आहे. स्मार्ट मिटर बसवलेल्या घरात  विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी सांगायची गरज नाही. ४५ दिवसा नंतर सरळ विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट होणार. ज्याने विद्युत बिलाचा भरणा करा सांगायची गरज भासणार नाही. ग्राहकच स्वतःचा विद्युत भरणा यूपीआय द्वारे करू शकतो विद्युत भरणा केल्यानंतर अर्ध्या तासानंतर विद्युत कनेक्शन पूर्ववत सुरू होणार.
स्मार्ट मीटर काय असते हे सध्या शहरी सह ग्रामीण भागातील ग्राहकांना पाहायला मिळत आहे यावेळेस ज्या विद्युत ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावलेले आहेत अशा ग्राहकांना विद्युत बिलाचा भरणा करायच्या तारीखे  नंतर ४५ दिवसांनी रिमोट ऑपरेटेड डिस्कनेक्ट सिस्टम द्वारे राज्यातील  २  लाख ४५ हजार वीस बिल थकीत ग्राहकांचे विद्युत मीटर डिस्कनेक्ट होणार. यात विशेष म्हणजे डिस्कनेक्ट झालेले विद्युत ग्राहक यांना या सिस्टम बद्दल माहिती नसल्याने ते चिंतित झाले व त्यांनी एम एस सी बी लाईनमन सोबत संपर्क  केला असता. त्यांनी माहिती दिली  की तुम्ही तुमच्या विद्युत बिलाचा भरणा केलेला नसेल  तेव्हा स्मार्ट मीटर रिमोट ऑपरेटिंग सिस्टम द्वारे स्वतःच डिस्कनेक्ट होईल व  जेव्हा तुम्ही विद्युत बिलाचा भरणा करणार त्यानंतर अर्ध्या तासाने तुमचे मिटर स्वतः कनेक्ट होऊन जाईल असा संदेश मिळाल्याने धास्तावलेल्या ग्राहकांनी यूपीआय द्वारे विद्युत बिलाचा भरणा केला व त्यांचे कनेक्शन पुर्वरात सुरू झाले.

Smart meters have arrived, if electricity bill is not paid, supply will be cut off
( या स्मार्ट मीटरच्या डिस्प्लेवर विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट झाल्याचे सिग्नल दिसून येतात ज्याला पाहता सिग्नल दिसल्यानंतर संबंधित ग्राहकाने त्याचे थकीत वीज बिल भरणा करायचे त्यानंतरच विद्युत मीटर पुर्वरत सुरु होणार )

1 thought on “स्मार्ट मीटर आले हो, विज बिल नाही भरले तर पुरवठा खंडित : Smart meters have arrived, if electricity bill is not paid, supply will be cut off”

  1. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) appears to be burdening genuine consumers with inflated bills and leveraging disconnection as a coercive tool to compel payment of disputed demands, raising serious concerns about abuse of authority.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top