‘Social Equality Week’ celebrated in Buldhana : बुलढाण्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ची धूम; 8 ते 14 एप्रिलदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम

बुलढाणा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्यात दि. 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात साजरा केला जात आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि समतेचा संदेश रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी दिली.
निवृत्तीला आलेल्या मास्तरचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे : Obscene gestures with masters स्टुडंट्स
या सप्ताहाची सुरुवात पत्रकार परिषदेतून झाली असून विविध दिवसांनुसार वेगवेगळ्या लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
9 एप्रिल रोजी शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि लघुनाट्य स्पर्धांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे.
10 एप्रिल रोजी ‘समतादूत’ पथनाट्यांच्या माध्यमातून ‘मार्जिन मनी’ योजनेसह विविध योजनांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम होणार असून ‘संविधान जागर’ अंतर्गत भारतीय संविधानाची माहिती व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
13 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळांमध्ये रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
तर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्य कार्यक्रमात मान्यवरांची व्याख्याने व चर्चासत्रे पार पडणार आहेत.
संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. ‘सामाजिक समता सप्ताह’मुळे जिल्ह्यात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश अधिक बळकट होणार आहे.


