mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सासुरवाडीवरून घराकडे जाताना अपघातात जावई ठार  :  Son-in-law killed in accident

शेअर करा :

सासुरवाडीवरून घराकडे जाताना अपघातात जावई ठार  :  Son-in-law killed in accident 

Son-in-law killed in accident : सासुरवाडीला भेट दिल्यानंतर रात्री घराकडे निघालेल्या जावयाचा ट्रकने कारला दिलेल्या धडकेने मृत्यू झाला.

Son-in-law killed in accident

साखळीजवळ ट्रकची डिझायरला धडक
बुलढाणा : सासुरवाडीला भेट दिल्यानंतर रात्री घराकडे निघालेल्या जावयाचा ट्रकने कारला दिलेल्या धडकेने मृत्यू झाला. येळगाव ते साखळीदरम्यान पैनगंगा नदीच्या पुलाजवळ ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
महेश कडूबा लोढे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे सासुरवाडीला भेट दिल्यानंतर महेश आपल्या गावी मेहकर तालुक्यातील मोहदरी येथे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच-२८-बीक्यू-२४१८ ने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जात होता. बुलढाणा ते चिखली मार्गावर साखळी फाट्याच्या अलीकडे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रक क्रमांक बीआर-०६-८४१२ ने कारला जोराची धडक दिली. या अपघातात महेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच बुलढाणा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत महेशचे काका केशव माधवराव लोढे यांच्या फिर्यादीवरून पोहेकॉ सुनीता खंडारे यांनी आरोपी ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ विकास सोनुने करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top