mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

साताऱ्यात ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद : State Level Arts Education Council

शेअर करा :

State Level Arts Education Council : राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे आयोजन साताऱ्यात करण्यात आले आहे.

साताऱ्यात ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद : State Level Arts Education Council

दिग्गज कलाकार आणि मंत्र्यांची मांदियाळी  

२८ व २९ मार्च रोजी ‘कलानगरी’ सातारा येथे कलाविष्काराचा सोहळा; राज्यातील कलाशिक्षकांना उपस्थित राहण्याचे नरेंद्र बाराई यांचे आवाहन

सातारा : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे आयोजन साताऱ्यात करण्यात आले आहे. २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे patishad होणार आहे.

शनिवार, २८ मार्च रोजी सकाळी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी कला क्षेत्रातील अनेक नामवंत अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

दोन दिवसांच्या या परिषदेत कलाशिक्षकांसाठी वैचारिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्तरावर भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे:

प्रात्यक्षिके : चित्रकार ओंकार पवार, सत्यजित वरेकर आणि युवा शिल्पकार मंदार लोहार यांची थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळणार आहे.

चर्चासत्रे : ‘रंगरेषा ते डिझाईन : सृजनात्मक प्रवास’ आणि ‘NEP (नवीन शैक्षणिक धोरण) मधील कलाशिक्षणाचे स्थान’ या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

करिअर संधी : कला क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि जागतिक स्तरावरील आर्ट स्टुडिओबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

पुरस्कार सोहळा : राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि कलाध्यापकांचा गौरव सोहळाही या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे.

समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रम

रविवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वाजता परिषदेचा समारोप होईल. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत  पाटील, शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. परिषदेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्गचित्र स्पर्धा आणि कलाशिक्षक खुला मंच असे उपक्रमही राबवले जाणार आहेत.

राज्यातील कलाशिक्षकांना आवाहन

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्य अध्यक्ष नरेंद्र बाराई यांनी या परिषदेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, “बदलत्या शैक्षणिक धोरणात कलेचे स्थान आणि कलाशिक्षकांचे भविष्य यावर या परिषदेत मंथन होणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कलाशिक्षक, कलाप्रेमी, कलाकार आणि चित्रकारांनी या कलाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”या  परिषदेच्या यशस्वीतेसाठी बुलढाणा जिल्हा कलाध्यापक संघाचे सचिव राम जाधव ,अध्यक्ष संजय काकडे आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top