Strict lockdown in Dongaon : चिखला येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डोणगाव येथे रविवार, २२ फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.

चिखला येथील घटनेचा निषेध : सकल शिवप्रेमींकडून आवाहन
डोणगाव : चिखला येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डोणगाव येथे रविवार, २२ फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी व नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांना केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
महिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
२० फेब्रुवारीच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काढून टाकण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांनी सुरू केले असता याला विरोध करणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडेदेखील फाडण्यात आले. या समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी डोणगाव येथील सकल शिवप्रेमी समाजाने २२ फेब्रुवारी रोजी डोणगाव बंदचे आवाहन केले होते. हा बंद शांततेचा मार्गाने पाळण्यात आला. संपूर्ण प्रतिष्ठान बंद होती. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती.

