mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाण्यात भरणार विद्यार्थी पक्षी संमेलन : Student bird convention to be held in Buldhana

शेअर करा :

Student bird convention to be held in Buldhana : शहरात पहिले आणि आगळेवेगळे विद्यार्थी पक्ष संमेलन १ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील मयूर कुंज येथे भरविण्यात येणार आहे.

पहिलेच आगळेवेगळे संमेलन
बुलढाणा : शहरात पहिले आणि आगळेवेगळे विद्यार्थी पक्ष संमेलन १ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील मयूर कुंज येथे भरविण्यात येणार आहे.
बुलढाणा व अकोला वनविभाग, अकोला निसर्ग कट्टा आणि मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने विद्यार्थी पक्षी संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सईशा काळवाघेची निवड करण्यात आली आहे. ही निवड मुलांमधूनच आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली. पर्यावरणविषयक एक स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्या स्पर्धकाला अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. या संमेलनात मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या दोन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पक्षीमित्र कृतज्ञता पुरस्कार सुंदरखेड येथील राहुल हरी चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. आज आपल्याला अवतीभोवती चिमणीचे दर्शन दुर्मिळ झालेले असताना राहुल चव्हाण यांनी आपल्या घराच्या सभोवताली अनेक चिमण्यांना निवारा उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या चारापाण्याची सोय केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून आजही आपल्याला त्यांच्या घराभोवती असंख्य चिमण्या पाहायला मिळतात. या त्यांच्या स्वत:च्या समाधानासाठी केलेल्या पर्यावरणपूरक आणि पोषककृतीचा सन्मान म्हणून त्यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच पुढील पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून या संमेलनात बालपक्षीमित्र मल्हार विनायक हिंगणे याला दीपस्तंभ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पक्षीचित्र प्रदर्शन
पक्षी अभ्यासक वाइल्ड लाइफ फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम यांनी टिपलेल्या विविध पक्षांच्या छायाचित्राची व डॉ. विनायक हिंगणे यांनी रेखाटलेल्या पक्षी चित्रांचे प्रदर्शन मयूर कुंज येथे १ व २ फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top