Students enjoyed building forts : शिवजयंतीच्या पर्वावर तोमाई मोंटेसरी हाऊस ऑफ चिल्ड्रेन स्कूलमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थी रममाण झाले.

बुलढाणा : गडकिल्ले हा सर्वांचाच आवडता विषय. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तर किल्ल्यांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आणि आदर दिसून येतो. शिवजयंतीच्या पर्वावर तोमाई मोंटेसरी हाऊस ऑफ चिल्ड्रेन स्कूलमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थी रममाण झाले.
विद्यार्थी व पालकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त इको फ्रेंडली गडकिल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने सुंदर व आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. विजेत्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (छायाचित्र : रविकिरण टाकळकर)

