mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विद्यार्थ्यांनो, ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा : Students, set goals and set a path

शेअर करा :

Students, set goals and set a path : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करावा. सोबतच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्व विकास करावा, असे प्रतिपादन डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी केले.

Students, set goals and set a pathStudents, set goals and set a path

डॉ. दुर्गासिंग जाधव जाधव यांचे आवाहन : विवेकानंद गुरुकुंजमध्ये बक्षीस वितरण

बुलढाणा  : अभ्यास करत असताना शारीरिक तंदुरुस्ती ही तितकीच महत्त्वाची असते. म्हणून विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच अभ्यासाबरोबर व्यायामाची सुद्धा सवय


लावली पाहिजे. त्यामुळे शरीर तर चांगले राहतेच आणि त्यातून एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. लहान विद्यार्थ्यांनी दररोज छोटे छोटे व्यायाम करून आपली तब्येत सुदृढ ठेवावी. सूर्यनमस्कार त्राटक घडाळीच्या सेकंदाकडे दररोज काही वेळ पाहणे यामुळे देखील एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करावा. सोबतच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्व विकास करावा, असे प्रतिपादन डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी केले.

विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेच्या पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनीच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन इंगळे हे होते. गजानन इंगळे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री स्वराज हाडे व सांस्कृतिक मंत्री, श्रावणी सुरडकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता इंगळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनल इंगोले यांनी केले. वर्षभर शाळेत घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात या स्पर्धेमध्ये क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top