mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विद्यार्थ्यांना बेदम मारहाण : Students were brutally beaten

शेअर करा :

Students were brutally beaten : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सफाई कामगाराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वांगेपल्ली येथे घडली.

Students were brutally beaten

सफाई कामगाराचे कृत्य

गडचिरोली : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सफाई कामगाराने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येणाऱ्या वांगेपल्ली येथे उघडकीस आला आहे. 

या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी सफाई कामगाराला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. अजय चंद्रागिरीवार या सफाई कामगाराने मुलांच्या जीवाची पर्वा न करता माणूस मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मोबाइलचोरीच्या आरोप केल्याने त्याने विद्यार्थ्यांना मारहाण  सांगण्यात येत आहे.

आपल्या पाल्यांना काही पालक शनिवारी शाळेत भेटण्यासाठी गेल्यानंतर हा  धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी अहेरी पोलिस  ठाणे गाठून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अजय चंद्रगिरीवार याला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्यात येत असल्याचे ठाणेदार हर्षल एकरे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top