Talathi beaten up in Motala tehsil : मोताळा तहसील परिसरात ६ एप्रिलला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दोघांनी तलाठ्यास मारहाण केली.

फेरफारची नोटीस प्रसिद्ध न केल्याचा राग
मोताळा : फेरफारची नोटीस प्रसिद्ध का केली नाही, असे म्हणत दोघांनी तलाठ्यास मारहाण केली. मोताळा तहसील परिसरात ६ एप्रिलला दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली.
बुलढाण्यातील सानेनगरमधील रहिवासी असलेले विश्वनाथ बळीराम उबरहंडे हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. ६ एप्रिल रोजी मोताळा तहसील कार्यालयात ते कर्तव्य बजावत होते. दुपारच्या वेळी सुनील घाटे व विजय धांडे (दोघे रा. मोताळा) यांनी फेरफारची नोटीस प्रसिद्ध का केली नाही? या कारणावरून उबरहंडे यांना मारहाण केली. तसेच कार्यालयातील शासकीय लॅपटॉप व इतर कागदपत्रे फेकून देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. खोट्या तक्रारी करून तु नोकरी कसा करतो तेच बघतो, अशा धमक्या दिल्या. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी बीएनएस कलम १३२, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास पीएसआय राजेंद्र कपले हे करीत आहेत.


