Teacher Sanjay Kolte felicitated on his retirement : माळवंडी येथील जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय ज्ञानदेव कोलते हे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले.

माळवंडी : येथील जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय ज्ञानदेव कोलते हे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले. याबद्दल दुधा केंद्रातील सर्व शिक्षक व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी दत्ताभाऊ क्षीरसागर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दुधा केंद्राचे केंद्रप्रमुख पी.एन. सोनुने, सव केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वाघ यांची उपस्थिती होती.
यावेळी कोलते यांचा सहपरिवार कपडे व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कोलते सरांनी सर्व सहकारी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मानून गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी, केंद्रातील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश उगले, माजी अध्यक्ष शंकरराव चव्हाण, गणेश डवले, राजू रायके, राजू नाटेकर, सदस्य दीपक कांबळे, अनिल लोखंडे, ग्रामविकास अधिकारी विनायक पंडित व गावकरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन अरुण चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

