The body reached home : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत सुतारकाम करणारा मिस्त्री जागीच ठार झाला.

दोन दुचाकींची टक्कर; मिस्त्री ठार, एक गंभीर
मलकापूर : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत सुतारकाम करणारा मिस्त्री जागीच ठार झाला. मलकापूर ते बुलढाणा मार्गावरील निंबारी फाट्यावर राजवीर पेट्रोल पंपासमोर २ फेब्रुवारीला सायंकाळी हा अपघात घडला.
शेख जावेद शेख हनीफ (३५) हा तरुण या अपघातात जागीच ठार झाला. घरच्या ओढीने तो घराकडे निघाला. मात्र, नियतीने मध्येच घात केला. अपघातात मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेहच घरी न्यावा लागला.
जावेद मलकापूर येथे डिलक्स फर्निचरवर काम करून सायंकाळी शेख जावेद हा एमएच-२८- के-४३९५ या दुचाकीने राजूर येथे घराकडे निघाला होता. निंबारी फाट्यावर सायंकाळी सातच्या वाजेच्या सुमारास एमएच-१९-सी-६०२ क्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर जोरात धडक झाली. या भीषण धडकेत शेख जावेद शेख हनीफ मृत्युमुखी पडला. तर मुक्ताईनगर (जळगाव) येथील सागर सुधीर झांबरे (वय ३६) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती समजताच पत्रकार विलास खर्चे, सोनू राजपूत, तुषार पाचपोळ, रोशन देशमुख, गोलू गुडगिल्ला, जयसिंग राठोड यांनी मदत केली.

