The disability screening camp at the District Hospital scheduled for April 3rd has been cancelled on account of Good Friday. : गुड फ्रायडे निमित्त 3 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबीर रद्द.

बुलडाणा: जिल्हा रुग्णालयात दर शुक्रवारी आयोजित करण्यात येणारे दिव्यांग तपासणी शिबीर येत्या 3 एप्रिल 2026 रोजी रद्द करण्यात आले आहे. ‘Good Friday’ निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या दिवशी नेत्र, मतिमंद/मनोरुग तसेच कान-नाक-घसा (ईएनटी) संबंधित दिव्यांग तपासणीसाठीचा विशेष बोर्ड होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विशेषतः प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होणारी ही तपासणीही यावेळी रद्द राहणार आहे.
तरी नागरिकांनी 3 एप्रिल रोजी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, सूचनेनंतरही कोणी रुग्णालयात आल्यास होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


