The name of strength is Mahatma Gandhi : ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या विषयावर गांधी विचार अभ्यासक चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान मंगळवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.

चंद्रकांत झटाले यांचे मंगळवारी व्याख्यान
बुलढाणा : पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या पाडळी शाखेच्या व बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या वतीने ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या विषयावर गांधी विचार अभ्यासक चंद्रकांत झटाले यांचे व्याख्यान मंगळवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.
जिजामाता महाविद्यालयात आयोजित या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नितीन चांगोले उपस्थित राहणार आहेत. तर ॲड. बाबासाहेब भोंडे. ॲड. भालचंद्र पवार, प्रा.डॉ. संतोष आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

