mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मुख्याध्यापकाकडून ग्रामस्थांसह शिक्षण विभागाची दिशाभूल : The principal misled the villagers and the education department

शेअर करा :

The principal misled the villagers and the education department : देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शेख अमिन यांच्या आपत्कालीन रजेसाठी शालेय व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्जच दिलाच नसल्याची बाब समोर आली आहे.

The principal misled the villagers and the education department

आपत्कालीन रजेचा शाळा समितीने अर्जच दिला नाही : देऊळगाव साकर्शा येथील मारहाण प्रकरण
बुलढाणा : देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शेख अमिन यांच्या आपत्कालीन रजेसाठी शालेय व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्जच दिलाच नसल्याची बाब समोर आली आहे. समितीच्या अध्यक्षांनी या संदर्भातील माहिती दिली.
शालेय व्यवस्थापन समितीने कुठल्याही प्रकारचा आपत्कालीन रजा मंजूर करण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला नाही. मात्र, शिक्षक शेख अमिन शेख जुम्मा हे गावकरी आणि शिक्षण विभागाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप होत आहे. तशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.
आपत्कालीन रजा मंजूर करावी, असा अर्ज समितीने दिला नसून सदर शिक्षकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिस खान मुसा खान व सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य शेख अबरार शेख गप्फार यांनी ‘महा देशा’ कडे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

काही गावकऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमिन यांना काही ग्रामस्थांनी मारहाण केली होती. याप्रकरणी चार जणांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे शेख अमिन हे आपत्कालीन रजेवर गेले आहेत. त्या अनुषंगानेच शाळा समितीने अर्ज दिल्याचे मुख्याध्यापकांनी म्हटले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top