mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बंधुत्व वाढवणे हाच रमजानचा खरा संदेश : The tru message of Ramajan is to promote brotherhood

शेअर करा :

बंधुत्व वाढवणे हाच रमजानचा खरा संदेश : The tru message of Ramajan is to promote brotherhood

The tru message of Ramajan is to promote brotherhood
ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देताना दिलीपकुमार सानंदा

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे प्रतिपादन : उत्साहात राष्ट्रवादी कॉंग्रेस व राणा फाउंडेशनच्या ईद मिलनमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

खामगाव : इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार रोजा ठेवताना चांगले पाहणे, चांगले ऐकणे, चांगले कर्म करणे आणि आपसातील मतभेद विसरून बंधुत्व वाढविणे हाच पवित्र रमजान खरा संदेश आहे, असे प्रतिपादन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

रमजान ईदनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राणा फाउंडेशनच्या वतीने टिळक राष्ट्रीय विद्यालयासमोरील प्रांगणामध्ये दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकमित्र सोपान गाडेकर गुरुजी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, अंजुमन एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वकारउलहक खान,  मोहंमद फारुख, सलीमभाई, ॲड. टी.एम. हुसेन, नगरसेवक तहेसीन शाह, अजीम कुरेशी, आबीद कुरेशी, मोहंमद फारुख, हाफीज साहेब, केशव कापले, मुन्ना बोंद्रे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सानंदा म्हणाले की, पवित्र रमजान महिन्यात रोजे ठेवणाऱ्यांना खुप पुण्य मिळते. मनुष्याला दुसऱ्याची मदत करण्याचा मार्ग दाखविल्या जातो. सर्वधर्म समभाव ही संकल्पना पुरातन काळापासूनच आपल्या संस्कृतीत रुजत आलेली आहे. सर्वांनी हा विचार जोपासून शांतता व जातीय सलोखा वृद्धिंगत करण्याचा संकल्प घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळी नऊ वाजता सजनपुरी येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीमबांधवांनी नमाज पठन केले. त्यानंतर आयोजित ईद मिलन कार्यक्रमात दिलीपकुमार सानंदा यांनी सर्वांचे गुलाब पुष्प व अलींगन देउन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदनिमित्त शहरात उत्साह पाहावयास मिळाला. नमाजदरम्यान सर्वांनी अल्लाहकडे प्रार्थना केली. या कार्यक्रमाला मुकदद्र खान, सय्यद इमरान, आबीद उलहक, पिंटुभाऊ जाधव, राम बुरंगे, दिनेश जाधव, पुरुषोत्तम शेजोळे, पुरुषोत्तम जाधव, सलीम मकवाना, युनुस शेख, हिदायत खान, अजिजभाई चायवाले, हाजी लतीफ सेठ यांच्यासह असंख्य हिंदु-मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top