Three acres of gram are burnt to ashes : वीज कोसळून तळणी येथील एका शेतकऱ्याचा तीन एकरातील हरभरा जळून खाक झाला.

मोताळा : वीज कोसळून तळणी येथील एका शेतकऱ्याचा तीन एकरातील हरभरा जळून खाक झाला. गुरुवार, १९ मार्चला रात्री ही घटना घडली.
मोताळा तालुक्यातील तळणी येथील श्रीनिवास पद्माकर नाफडे यांनी हरभरा पेरला होता. तीन एकरातील हरभरा सोंगून त्याची गंजी घालण्यात आली होती. गुरुवार, १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वादळी पावसात वीज कोसळल्याने हरभऱ्याची गंजी जळाली. यात सुमारे दोन लाखांवर नुकसान झाले आहे.
शेतात काबाडकष्ट उपसून हरभऱ्याची शेती फुलविली होती. ऐन काढणीच्या वेळी आस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी नाफडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अधिक उत्पन्न आणि उत्पादनाची शेतकऱ्याची आशा फोल ठरली.


