Times attack on the teacher : भरधाव वाहनाने स्कुटीला उडविल्याने झालेल्या अपघातात शिक्षिका ठार झाली.


होळीच्या सणालाच दुर्दैवी अपघातात मृत्यू
संग्रामपूर : होळीच्या सणाच्या दिवशी २ मार्चला सकाळी सव्वासात वाजता एका शिक्षिकेवर काळाने झडप घातली. भरधाव वाहनाने स्कुटीला उडविल्याने झालेल्या अपघातात शिक्षिका ठार झाली. संग्रामपूर तालुक्यातील कवठळ ते भेंडवळ मार्गावरील पेसोडा फाट्यानजीक ही दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात वृषाली प्रकाश गावंडे (वय ३६) यांचा मृत्यू झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील त्या रहिवासी होत्या. पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथील जिल्हा परिषद शाळेवर त्या शिक्षिका होत्या. स्कुटी (क्रमांक एमएच-२८-एएल-५८१५) ने त्या शाळेसाठी निघाल्या होत्या. मात्र, अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याने त्या ठार झाल्या.

