mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

युडीआयडी प्रकरणात बारा दिव्यांग शिक्षक निलंबित; दोन ग्रामसेवकांनाही दणका : Twelve disabled teachers suspended in UDID case

शेअर करा :

Twelve disabled teachers suspended in UDID case : युडीआयडी कार्ड नसलेल्या १२ संशयित दिव्यांग शिक्षकांसह दोन ग्रामसेवक आणि एक शिपाई अशा १५ जणांवर बुधवार, १८ मार्चला निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Twelve disabled teachers suspended in UDID case

झेडपी सीईओ गुलाबराव खरात यांची कारवाई

बुलढाणा : युडीआयडी कार्ड नसलेल्या १२ संशयित दिव्यांग शिक्षकांसह दोन ग्रामसेवक आणि एक शिपाई अशा १५ जणांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. 

अनेक बोगस दिव्यांग शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, लाभ घेत असल्याने पात्र दिव्यांगांवर अन्याय होत आहे. अलीकडच्या काळात राज्यभरामध्ये दिव्यांगांची संख्या अधिकच वाढल्याने बोगस प्रमाणपत्र अनेकांनी घेतल्याच्या तक्रारी शासन दरबारी झाल्या होत्या. त्याची दखल घेत दिव्यांग कल्याण मंत्रालयाने जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचारी तसेच दिव्यांग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची व प्रमाणपत्राची पडताळणी सुरू केली आहे. युडीआयडी कार्ड तपासले जात आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी तपासणी मोहीम अधिक तीव्र गतीने केली. 

 

तपासणीसाठी समितीची नेमणूक; सीईओसमोर हजर झाले नाही कर्मचारी

दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तपासण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. ज्यांच्याकडे युडीआयडी कार्ड नाही अशा कर्मचाऱ्यांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सीईओंच्या दालनात मूळ कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. १२ सहाय्यक शिक्षक, दोन ग्रामसेवक आणि एक परिचर हजर राहिले नाहीत. त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीदेखील देण्यात आली. युडीआयडी कार्ड नाही, त्यातच दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रावरही संशय असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

घेतलेल्या लाभांची चौकशी

दिव्यांग अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या (युडीआयडी कार्ड) आधारे बदली, सरळसेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता असे शासनाचे लाभ घेतले काय? याची तपासणी करण्यात आली. युडीआयडी कार्ड नाही, त्यातच दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रावरही संशय असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top