Two hundred youth got jobs at once : रोजगार मेळाव्यात ३३ नामांकित कंपन्यांनी या ठिकाणी १ हजार ७०० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ५५० जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर २०० उमेदवारांना जागीच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

३३ कंपन्यांत निवड : कौशल्य विकासच्या मेळाव्यात जागीच नोकरी; ५५० जणांची प्राथमिक निवड
बुलढाणा : जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एकूण ३३ नामांकित कंपन्यांनी या ठिकाणी १ हजार ७०० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ५५० जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर २०० उमेदवारांना जागीच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उपायुक्त द. ल. ठाकरे तरुणांना मार्गदर्शन करताना म्हणाले, तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, मिळालेल्या अनुभवातून भविष्यात स्वतःचे उद्योग सुरू करून उद्योजक बनले पाहिजे. बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिपचे संचालक जुमले यांनी यावेळी शिकाऊ उमेदवारी योजनेचे महत्त्व समजावून दिले.

माऊली ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, आमची संस्था जिल्ह्यातील तरुणांना मदत करण्यासाठी आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवण्यासाठी नेहमीच तयार आहे. प्राचार्य डॉ. जाधव यांनीही यावेळी महाविद्यालयाच्या सामाजिक भूमिकेबद्दल माहिती दिली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग ऑफिसर तुषार बढे, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

