Voting bans alcohol! :

ब्रह्माच्या महिलांनी बाटली केली आडवी : तरुणींपासून ते वृद्ध महिला मतदानासाठी केंद्रांवर
वाशीम : विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीला जसे मतदान होते, अगदी त्याच उत्साहाने ब्रह्मा येथील आडवी केली. महिलांची दुश्मन ठरलेली दारू हद्दपार करण्यासाठी स्वतःच नारीशक्तीने ताकदीने लढा दिला आणि दारूविक्रेत्याविरुद्ध एकीच्या बळाने ही लढाई स्त्रीयांनी जिंकली.
वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा या गावात दारूची बाटली भरभरून केलेल्या मतदानातून आडवी झाली. ९ फेब्रुवारीला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. तहसीलस्तरावरून मतदान कर्मचारी सकाळीच हजर झाले. सायंकाळीच निकाल जाहीर झाला आणि दारूचा ‘ निकाल ‘ लागला.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तरुण पिढी दारूच्या नादाला लागून बरबादीच्या वाटेने निघाली. महिलांनी निकराचा लढा देऊन आपले कपाळाचे कुंकू पुसण्यापासून वाचविले. शिवाय उद्याचे देशाचे भविष्य असलेली तरुणाईदेखील या कट्टर रणरागिणींनी सावरली.
दारूविरुद्ध ५२३ मतदान
ब्रह्मा गावात ८१४ महिला मतदारसंख्या आहे. यापैकी ५५३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावून खऱ्या अर्थाने ताकदीने दारूमुक्तीची चळवळ राबविली. काही वृद्ध महिलांना तर मतदानासाठी चक्क उचलून केंद्रापर्यंत नेण्यात आले. स्वयंस्फूर्तीने महिला मतदानासाठी पुढे आल्या.
१६ मते अवैध
मतदान करताना काही महिलांनी मतदान करताना केलेल्या चुकीमुळे १६ मते अवैध झाली. निकाल लागताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष साजरा केला.
दारूच्या बाजूने
केवळ १४ महिला
दारूचे दुकान सुरू रहावे, यासाठी १४ महिलांनी मतदान केले. बाकी सर्व मतदान विरुद्ध झाले. त्यामुळे दारू दुकानदाराला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे.
कारवाईचे अधीक्षकांना पत्र
उत्पादन शुल्क अधीक्षकांना पत्र
दारूविरुद्धचा निकाल घोषित झाल्यानंतर निवडणूक नायब तहसीलदार सी.एस. आडे यांनी दारू दुकानावर कारवाई करण्यासाठी पत्र पाठविले आहे.



…………
ADVT

बुलढाणा :
Doctor किंवा Engineer बनायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुलढाण्यातील PAHEL Institute ने एक मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली आहे. आता NEET, MHT-CET सोबतच JEE Mains व Advanced साठीची संपूर्ण आणि स्मार्ट तयारी एकाच ठिकाणी PAHEL Institute मध्ये करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे *Avanti Learning’s, Mumbai येथील Expert IITian Faculties* यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना Concept-based Teaching सोबत Exam-oriented Practice दिली जाणार आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, वैयक्तिक लक्ष, शिस्तबद्ध अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण चाचण्या यामुळे PAHEL Institute ने यापूर्वीही उल्लेखनीय निकालांची परंपरा निर्माण केली आहे.
संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवणे हे PAHEL Institute चे ध्येय आहे.”
मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
PAHEL Institute – Learn & Lead
📍 चैतन्यवाडी, बुलढाणा
📞 97630 09156 |
97669 24900

