Wife at her parents’ home; husband commits suicide. : पत्नी माहेरी, पतीची आत्महत्या

बुलढाणा ( प्रतिनिधी )
धाड : पत्नी माहेरी गेली असताना पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. धामणगाव येथे ही घटना घडली.
अमोल शंकर देवकर (वय ३३) असे मृतक तरुणाचे नाव आहे. गणेश देवकर हा त्याचा धाकटा भाऊ असून दोघेही वेगवेगळे राहतात. अमोलची पत्नी माहेरी गेलेली होती. ७ एप्रिल २०२६ रोजी त्याने भावाला जेवणाचा डबा घरी पाठव असे सांगितले होते. आतेभाऊ अक्षय जंजाळ व पवन काळे हे दोघे जेवणाचा डबा घेऊन मृतकाच्या घरी गेले व घराचा दरवाजा लोटून पाहिले असता अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला झटके येताना असल्याने तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अमोलने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला टच करा https://mahadesha.com/
भाऊ गणेश देवकरच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्रीकृष्ण चव्हाण करीत आहेत.


