mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार : Will interact with party workers for the selection of the District President.

शेअर करा :

Will interact with party workers for the selection of the District President. : काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाचा जिल्ह्यात प्रारंभ 

Will interact with party workers for the selection of the District President.

बुलढाणा : कॉंग्रेसचे संघटन बूथस्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातही या अभियानाची सुरुवात झाली आहे. संघटन सृजन अभियानाचा शनिवार, ४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात प्रारंभ झाला. एकूण आठ दिवसांच्या या अभियानाचा पहिला टप्पा हा चार दिवसांचा तर उर्वरित दुसरा टप्पा पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर पार पडणार आहे. या अभियानात काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून नवीन जिल्हाध्यक्ष निवडला जाणार असल्याची माहिती संघटन सृजन अभियानचे समन्वयक अब्दुल हनान यांनी दिली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, सह समन्वयक विरेंद्र जगताप, प्रशांत पचाडे, ईश्वरीताई राठोड यांची उपस्थिती होती.

बुलढाणा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अब्दुल हनान म्हणाले, संघटन सृजन अभियान आतापर्यंत २० राज्यांमध्ये राबविण्यात आले आहे. त्याठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या या अभियानाद्वारे करण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संघटन सृजन अभियानाची समिती संवाद साधणार आहे. बूथ स्तर ते राज्य स्तरापर्यंत पक्षाला सशक्त करणे, समर्पित कार्यकर्त्यांना सक्षम करणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शकपणे वाटप करणे तसेच महिला व युवकांना पक्ष संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून घेणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. या अभियानातूनच जिल्हाध्यक्षांसह विविध पदांच्या नियुक्त्या या पारदर्शक पद्धतीने केल्या जातील. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला तीन पानांचा अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर सहा नावांची शिफारस अभियान प्रदेश काँग्रेसकडे करणार असून त्यातूनच जिल्हाध्यक्ष निवडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियानाचा पहिला टप्पा

या अभियानाला शनिवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला असून बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हा विस्तारित कार्यकारिणीसोबत अभियान समितीची चर्चा झाली. त्यानंतर बुलढाणा ब्लॉक काँग्रेससोबत बैठक झाली. रविवार, ५ एप्रिल रोजी चिखली, देऊळगाव राजा, लोणार येथे अभियानाच्या बैठका होतील. सोमवार, ६ एप्रिल रोजी मेहकर व खामगाव येथे ब्लॉक काँग्रेसच्या बैठकीला समन्वयक मार्गदर्शन करणार आहे. तर ७ एप्रिलला शेगाव, नांदुरा, मलकापूर येथे ब्लॉक काँग्रेसची बैठक होईल.

जिल्हाध्यक्षासाठी अर्ज भरणार नाही : बोंद्रे

गत १२ वर्षांपासून काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. या काळात भरपूर काम करण्याची संधी मिळाली. नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, यासाठी मी जिल्हाध्यक्षपदाचा अर्ज भरणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळातही काँग्रेस पक्षवाढीसाठीच अहोरात्र झटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top