Woman goes missing from pilgrimage : नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी यात्रेमधून एक विवाहित महिला बेपत्ता झाली.

गुढीपाडव्याच्या दिवशी ची घटना
नांदुरा : गुढीपाडव्याच्या दिवशी २५ वर्षीय महिला निंबोळा देवी यात्रेतून बेपत्ता झाली.
गुढीपाडवा (चैत्र शुक्ल प्रतिपदा) च्या मुहूर्तावर तालुक्यातील निंबोळा येथे निंबोळा देवीची यात्रा भरली. शिरसोडी येथील भूषण मारोती भोलनकर व त्यांची पत्नी शिवानी देवीच्या दर्शनाला गेले होते. यात्रेत गर्दीत पती-पत्नीची ताटातूट झाली. त्यांनी इतरत्र तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला. परंतु शिवानी या सापडल्या नाही. पतीने अखेर पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली.
रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा सडपातळ, चेहरा लांब, अंगात हिरव्या रंगाची साडी व लाल पांढऱ्या रंगाची चप्पल घातलेली असे बेपत्ता महिलेचे वर्णन आहे. पुढील तपास पोहेकाॅ चिखलकर करीत आहेत.


