mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

ऐतिहासिक लोणारनगरीत ७ एप्रिलला योग महोत्सव : Yoga festival on April 7 in the historic city of Lonar

शेअर करा :
Yoga festival on April 7 in the historic city of Lonar : आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिलला लोणार येथे योग महोत्सव आयोजित केला आहे.
Yoga festival on April 7 in the historic city of Lonar
पत्रकार परिषदेत माहिती देताना ना. प्रतापराव जाधव
केंद्रिय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती
बुलढाणा : आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र २१ जूनला साजरा केला जातो. या दिनाला ७५ दिवस बाकी असताना योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिलला लोणार येथे योग महोत्सव आयोजित केला आहे. या योग साधनेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रिय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे रविवारी पत्रकार परिषदेत केले.
जागतिक कीर्तीच्या लोणार शहरात आयोजित योग महोत्सवाबद्दल माहिती देताना ना. प्रतापराव जाधव म्हणाले, योग साधना ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन आणि महान परंपरा आहे, जी केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद साधणारी एक जीवनशैली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरही योग साधनेचा स्वीकार केल्या जात आहे. भारतीय योग साधनेला जागतिकस्तरावर पोहोचून भारतीय योग साधनेच्या माध्यमातून विश्वकल्याण व्हावे या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला  पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
शंभर दिवस योग महोत्सव 
२१ जून २०२६ ला १२वा योग दिन साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या वतीने १०० दिवसाचे योग महोत्सव-२०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला कार्यक्रम दिल्ली येथे झाला. दुसरा ७५ दिवस बाकी असलेला काऊंट डाऊन योग महोत्सव कार्यक्रम ७ एप्रिलला बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उदयान येथे  होत आहे.
सात हजार साधकांचा सहभाग
या योग साधनेमध्ये सात हजारांहून अधिक योग साधक सहभागी होणार आहेत. या योग साधनेच्या माध्यमातून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या लोकांची सर्वाधीक संख्या राहणार आहे, असे जाधव म्हणाले. योग साधनेमध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनाईझेशन, योग विद्या गुरुकूल क्रिडा भारती पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हींग, लोणार येथील महिला बचत गट, शाळकरी विद्यार्थी आयुष संस्थेतील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
पत्रकार परीषदेला मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानचे निदेशक डॉ. काशिनाथ समघंडी, कार्यक्रम अधिकारी डॉ. ईश्वर आचार्य उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top