Young man dies after falling from tractor.: ट्रॅक्टरमधून पडल्याने तरुणाचा मृत्य.

सिंदखेड राजा : कडबा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पाइपलाइनसाठी खोदलेल्या नालीवरून उसळल्याने समोर बसलेला युवक रोडवर पडून चाकाखाली चिरडल्याने ठार झाला. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे गुरुवार, १९ मार्चला ही घटना घडली.
समाधान दळवी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो लोणार तालुक्यातील भुमराळा येथील रहिवासी होता. विना नंबरच्या ट्रॅक्टरवर कडबा घेऊन जात असताना समाधान चालकाच्या बाजूने बसलेला होता. मलकापूर पांग्रा शिवारात नेहरू विद्यालयासमोर पाइपलाइनच्या नालीवरून ट्रॅक्टर उसळले. खाली कोसळल्यानंतर ट्रॅक्टरच्या चाकासोबत घासत गेल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी बीबी येथे नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याता पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत होते. परंतु वाटतेच त्याची प्राणज्योत मालवली.


