mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पोलिस भरतीत धावताना तरुणाचा मृत्यू : Young man dies while running for police recruitment

शेअर करा :

Young man dies while running for police recruitment : पुणे येथे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीवेळी असताना बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोली बुररकुलच्या तरुणाचा फिट येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

Young man dies while running for police recruitment
पुरुषोत्तम बुरकुल

पुणे येथे पोलीस मैदानावरील घटना : चिंचोलीच्या पुरुषोत्तमचे खाकी जे स्वप्न अधुरे

बुलढाणा : कारागृह व सुधार सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत पुणे येथील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणीवेळी धावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाचा फिट येऊन मृत्यू झाला. शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) या तरुणावर धावतानाच काळाने झडप घातली. अकाली मृत्यूमुळे त्याचे खाकी वर्दीचे स्वप्न अधुरे राहिले. देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरुकुल येथील रहिवासी असलेला पुरुषोत्तम पोलिस भरतीसाठी पुरुषोत्तम तयारी करीत होता. पुणे येथे पोलिस शिपाई पदासाठी त्याने अर्ज केला. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती सुरू होती. २८ मार्चला सकाळी सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता. दोन फेऱ्या त्याने पूर्ण केल्या. तिसऱ्या फेरीवेळी त्याला अचानक फिट आले आणि बेशुद्ध होऊन मैदानावर कोसळला. त्याला रुग्णलयात हलविण्यात आले. परंतु आधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

तीन वर्षांपासून पुरुषोत्तमचे वडील भीमराव हे अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. पुरुषोत्तम हाच त्यांचा आधार होता. मात्र, अचानक झालेल्या मृत्युमुळे पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे राहिले. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीय शोकाकुल झाले असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Young man dies while running for police recruitment
पुणे येथील याच मैदानावर पुरुषोत्तमचा कोसळून मृत्यू झाला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top