mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जि.प. कर्मचाऱ्यांनी जिवंत देखाव्यांमधून दिला सामाजिक संदेश : ZP employees gave social message through live performances

शेअर करा :

जि.प. कर्मचाऱ्यांनी जिवंत देखाव्यांमधून दिला सामाजिक संदेश : ZP employees gave social message through live performances

ZP employees gave social message through live performances : जिल्हा क्रीडा संकुलावर ४ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधून जिल्हा परिषदेचे खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. चौदा संघांच्या खेळाडूंनी केलेल्या पथसंचलनात सादर केलेले विविध सामाजिक विषय व आशयाधारित देखावे आकर्षक व लक्षवेधक ठरले. त्यातून सामाजिक संदेश देण्यात आले.

ZP employees gave social message through live performancesZP employees gave social message through live performances ZP employees gave social message through live performances ZP employees gave social message through live performances ZP employees gave social message through live performances ZP employees gave social message through live performancesZP employees gave social message through live performances

बुलढाणा : जिल्हा क्रीडा संकुलावर ४ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधून जिल्हा परिषदेचे खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. चौदा संघांच्या खेळाडूंनी केलेल्या पथसंचलनात सादर केलेले विविध सामाजिक विषय व आशयाधारित देखावे आकर्षक व लक्षवेधक ठरले. त्यातून सामाजिक संदेश देण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्यालयाच्या संघाने राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करताना ढोल, ताशे, लेझीम व भगव्या पताकांसह गणेश पूजनाचा भक्ती भाव दर्शक देखावा साकारला. शेगाव पंचायत समितीच्या चमुने मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा महापुरुषांचा संदेश दृढ करण्यासाठी विविध महापुरुषांच्या वेषभूषा धारण केल्या.
राष्ट्रमाता मॉं जिजाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा पंचायत समितीने मा जिजाऊ व बाल शिवबा यासह मावळ्यांची वेशभूषा केली. शासनाने महिला व बाल संगोपनासाठी सुरू केलेल्या आरोग्य व पोषण योजनेस राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करतानाच बाल संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले.
माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मातृभाषेतील शिक्षण व मराठी शाळांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती मोताळ्याच्या चमुने मातृभाषेतील शिक्षणाबद्दल जाणीव जागृती केली. याच विषयाला अनुसरून मेहकर पंचायत समितीच्या चमुने ग्रामीण भागातील मराठी शाळा वाचवा हे आर्जव करणारे कथानक देखाव्यातून सादर केले.
देऊळगाव राजा पंचायत समितीच्या चमुने आपली आगळीवेगळी ओळख दर्शविताना मराठी संस्कृतीतील विविध सण, उत्सव व संस्कृतीचे दर्शन घडविले. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी पंचायत समिती लोणारच्या चमुने नाट्य संगीतिकाद्वारे नवभारत साक्षरता अभियानाचा संदेश दिला.
महिला संरक्षण व सुरक्षेच्या अनुषंगाने ॲसिड हल्ल्याचे संवेदनशील दृश्य उभे करून ‘तिला जाळू नका’ हा समाज सुधार संदेश देऊन ‘होईल मी स्वयंसिद्ध’ असा महिला सक्षमीकरणाचा संदेश खामगाव पंचायत समितीच्या खेळाडूंच्या चमुने दिला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग व बलिदानाची वीर कथा सादर करताना चिखली व जळगाव जामोद येथील खेळाडूंच्या चमुने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. तर मलकापूर व नांदुरा या पंचायत समितीमधील खेळाडूंच्या चमुने स्वतंत्रपणे ऑपरेशन सिंदूर व दहशतवादविरुद्ध मोहिमेची भारतीय सैन्य दलाची सक्षमता व राष्ट्रभक्तीबद्दल संदेश दिला.
जिल्ह्यातील दुर्गम गावांच्या विकासासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या संग्राम अभियानाच्या अनुषंगाने जाणीव जागृती व उद्बोधन करण्यासाठी बुलढाणा पंचायत समितीच्या चमुने पारंपरिक बंजारा वेषभूषेत व बोलीभाषेत आकर्षक नृत्य सादर केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top