mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिपायाला लुटणाऱ्या पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या : The five accused who robbed a soldier are smiling with a smile

शेअर करा :

The five accused who robbed a soldier are smiling with a smile : मराठवाड्यातील शाळेवरील शिपायाला देऊळगाव राजा येथे  अडवून लुटमार करणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे.

The five accused who robbed a soldier are smiling with a smile

एलसीबीने उघडकीस आणला गुन्हा

बुलढाणा : मराठवाड्यातील शाळेवरील शिपायाला देऊळगाव राजा येथे  अडवून लुटमार करणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. अटकेतील सर्व आरोपी २० ते २८ वयोगटातील आहेत.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणिक लोढा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात येणाऱ्या पापळ येथील रहिवासी सूर्यकांत दिनकर सरोदे हे एका शाळेवर शिपाई म्हणून कार्यरत आहेत. देऊळगाव राजा शहरातील बायपास रोडने २४ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री सरोदे निघाले असताना पाच जणांनी गाडी अडवून रोख रकमेसह मोबाइलची लुटमार केली होती. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा छडा लावण्यासाठी कसून तपास सुरू केला. हे सर्व आरोपी देऊळगावराजातीलच असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या ताब्यातून १३ हजार ५०० रुपये, मोबाइल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अटक आरोपींची नावे
विशाल सुरेश शेळके (वय २२), भावेश दिलीप कासारे (वय २३), आदित्य उर्फ छोट्या सुभाष पाखरे (वय २१), बादल भगवान घुगे (वय २८) व रितेश गजानन घुगे (वय २२) या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.


कारवाईचे शिलेदार

पोलीस हेड कॉन्स्टेबल, दिगंबर कपाटे, पोलीस शिपाई मनोज खरडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, पोलीस शिपाई ऋषिकेश खंडेराव यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. तसेच आरोपींना देऊळगाव राजा पोलीस ठाण्याकडे स्वाधीन करण्यात आले. घटनेचा अधिक तपास पीएसआय राजकुमार कांबळे हे करीत आहेत. 

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर केली लुटमार

लुटमार प्रकरणातील आरोपी विशाल सुरेश शेळके (रा. अमृतनगर, देऊळगाव राजा) याने वर्षभरापूर्वी एकाचा खून केला होता. त्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने आपली गुन्हेगारी वृत्ती सोडली नाही. लुटमारीच्या गुन्हा त्याला पुन्हा अटक करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top