mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आई, भावासह पुतण्याला संपविले सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड : Mother, brother, and nephew killed; triple murder in Somthana.

शेअर करा :

Mother, brother, and nephew killed; triple murder in Somthana. : आई, भावासह पुतण्याला संपविले सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड : शेतीच्या वादाने केला घात

Mother, brother, and nephew killed; triple murder in Somthana.


बुलढाणा प्रतिनिधी दि ९ : शेतजमीन आणि संपत्तीच्या वादातून आतापर्यंत अनेकांची हत्या झाली आहे. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने रक्ताचे नाते वैरी होते आणि हत्याकांड घडते. रक्तपात हा नकोच! अशा काही घटना घडल्या की व्यक्ती दुःख व्यक्त करतो. दुश्मनासोबतही काही वाईट घडू नये, असे विचार येतात. मात्र, राग आणि लोभ निर्माण झाला की समोरच्याला संपविण्याचा विचार तातडीने येतो. अशीच शेतीसाठी जन्मदात्री, सख्खा भाऊ आणि पुतण्या अशा तिघांना रक्ताच्या नात्यातील भावाने कायमचे संपविले. चाकूने सपासप वार करून हत्या केली. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे ही काळीज पिळवटून टाकणारी ही घटना ८ ऑक्टोबरच्या सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

आरोपी दीपक फत्तेसिंह सुरडकर या आरोपीने स्वतःचे कुटुंब कायमचे संपविले. आई सरस्वती फत्तेसिंग सुरडकर (वय ७०) , भाऊ संजय फत्तेसिंग सुरडकर (वय ४८) आणि भावाचा मुलगा, पुतण्या रणजीत संजय सुरडकर यांची आरोपीने धारदार चाकूने हत्या केली..
मारेकरी दीपक फत्तेसिंग सुरडकर हा फरार झाला असून, पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे. शेतीच्या वादातून आरोपी दीपकने आई सरस्वती, भाऊ संजय आणि पुतण्या रणजित यांच्यावर राग काढत त्यांना कायमचे संपविले. आईने दीपकच्या नावावरील शेती संजयच्या नावाने केल्याने संतापून त्याने हे हत्याकांड घडविल्याची माहिती समोर येत आहे. तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top