mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दुष्काळात शेतकरी, दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या पाठीशी शासन खंबीर : Government stands firm with farmers, disabled and senior citizens during drought

शेअर करा :

Government stands firm with farmers, disabled and senior citizens during drought : दुष्काळात शेतकरी, दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या पाठीशी शासन खंबीर : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव 

Government stands firm with farmers, disabled and senior citizens during drought


सेवा सप्ताहात ७०३ लाभार्थ्यांना ८० लाखांचे सहाय्यभूत साहित्य; बुलढाण्यातच तपासणी-वितरण केंद्र

 

बुलढाणा, दि. २३ (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या संकटात शेतकरी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. दिव्यांगांना स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जगता यावे, यासाठी विविध योजनांमधून आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताहा’त दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ७०३ लाभार्थ्यांना सुमारे ८० लाख रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले. त्यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी गाड्या, व्हीलचेअर आणि काठ्यांसह विविध आवश्यक साधनांचा समावेश होता.

Government stands firm with farmers, disabled and senior citizens during drought

दुष्काळात खचू नका; शासन साथ देईल

अल-निनोच्या प्रभावामुळे बुलढाण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामही अडचणीत आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. या कठीण काळात शेतकऱ्यांनी हतबल न होता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा; केंद्र व राज्य शासनासह लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस जल्लोषात किंवा खर्चिक पद्धतीने साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि मित्रपरिवाराला अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात आठवडाभर विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. सुमारे १५ आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

Government stands firm with farmers, disabled and senior citizens during drought

 सुमारे २,९०० दिव्यांगांना साहित्य देण्याचे नियोजन

राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चार दिवसीय आरोग्य तपासणी शिबिरात अनेक दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीच्या आधारे पहिल्या यादीतील २ हजार ४६७ आणि दुसऱ्या यादीतील ४४२ अशा एकूण सुमारे २ हजार ९०० लाभार्थ्यांना गरजेनुसार सहाय्यभूत साहित्य देण्याचे नियोजन आहे. या साधनांमुळे दैनंदिन कामे सुलभ होऊन स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होईल, असे जाधव म्हणाले.

आवश्यक साहित्य मिळवण्यासाठी पूर्वी दिव्यांगांना नागपूरला जावे लागत असे. प्रवास आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांना ते शक्य होत नव्हते. ही अडचण दूर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातच तपासणी आणि साहित्य वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे तज्ज्ञांकडून तपासणी करून गरजेनुसार साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. शेजारील जिल्ह्यांतील दिव्यांगांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि आधाराने जगता यावे, यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थ्यांनी मिळालेल्या साहित्याचा योग्य वापर करून स्वावलंबी जीवन जगावे, असे जाधव म्हणाले. भविष्यात आणखी मदतीची गरज भासल्यास संपर्क साधावा; आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top