mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चालठाणा जंगलात दोन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू : Suspicious death of two leopards in Chalthana forest

शेअर करा :

Suspicious death of two leopards in Chalthana forest : चालठाणा जंगलात दोन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू! वनविभागात खळबळ; वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

Suspicious death of two leopards in Chalthana forest


जळगाव जामोद दि २३ : बुलढाणा जिल्ह्यातील चालठाणा वनपरिक्षेत्रात दोन बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. २१ नोव्हेंबर रोजी वनगस्तीदरम्यान कक्ष क्रमांक ६२३ मध्ये ही घटना उघडकीस आली. एकाच ठिकाणी दोन बिबट मृतावस्थेत आढळल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Suspicious death of two leopards in Chalthana forest

वनरक्षक कु. आर. के. राऊत  वनमजुरांसह गस्तीवर असताना त्यांना दोन बिबट मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत वनगुन्हा क्रमांक २८४०२/१८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सहाय्यक वनसंरक्षक, पशुधन विकास अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक तपासात दोन्ही बिबट्यांचा मृत्यू आपापसातील झुंजीतून झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

मात्र, मृत बिबट्यांचे नमुने पुढील न्यायवैद्यकीय तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर मृत्यूबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

मुख्य वनसंरक्षक अमरावती श्रीमती ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक बुलढाणा श्री. जमीर शेख आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तातडीने १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top