Union Minister Prataprao Jadhav inspected the site for the health meet to be held in Shegaon : येथे २५ फेबुवारी रोजी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनासमवेत वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.

शेगाव : येथे २५ फेबुवारी रोजी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनासमवेत वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
केंद्रीय आयुष्य मंत्रालयाच्या वतीने येत्या २५ फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे आयुष आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्थळ निश्चिती करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः ७ फेबुवारी रोजी शेगाव शहरातील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, देशमुख फार्म आणि विसावा परिसरातील जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्येक स्थळाची पाहणी करून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चाही केली.

