mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मेहकरच्या प्रज्वलचा लोणावळा येथे दरीत कोसळून मृत्यू :  Prajwal dies after falling into a valley in Lonavala

शेअर करा :

Prajwal dies after falling into a valley in Lonavala :

पुणे येथे घेत होता बीएडचे शिक्षण

नागेश कांगणे
मेहकर
येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे २६ वर्षीय पुत्र प्रज्वल गिरी याचा ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लोणावळा येथील दरीत कोसळून त्याचे दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रज्वल गिरी हा पुणे येथे बीएडचे शिक्षण घेत होता. तिथेच तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. ८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा त्याच्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईवरून पुण्याला येत होता. लोणावळा येथे अल्पोपहार करण्यासाठी ही मंडळी थांबली. परंतु प्रज्वल व त्याचा मावसभाऊ या दोघांनी आम्ही टेकडीवरून फिरून येतो, असे सांगितले. तेथे जाणे त्याच्या जीवावर बेतले. पाय घसरून प्रज्वल हा खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी मेहकर येथील मेएसो महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. वऱ्हाड निघालय लंडनला या एकपात्री प्रयोगाचे त्यांनी पाचशेपेक्षा अधिक प्रयोग राज्यभर सादर केले आहेत. क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे त्यांनी हजारावर सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय काल रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले. प्रज्वलच्या मृतदेहावर मेहकर येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुणे येथे घेत होता बीएडचे शिक्षण

नागेश कांगणे
मेहकर : येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे २६ वर्षीय पुत्र प्रज्वल गिरी याचा ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लोणावळा येथील दरीत कोसळून त्याचे दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रज्वल गिरी हा पुणे येथे बीएडचे शिक्षण घेत होता. तिथेच तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. ८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा त्याच्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईवरून पुण्याला येत होता. लोणावळा येथे अल्पोपहार करण्यासाठी ही मंडळी थांबली. परंतु प्रज्वल व त्याचा मावसभाऊ या दोघांनी आम्ही टेकडीवरून फिरून येतो, असे सांगितले. तेथे जाणे त्याच्या जीवावर बेतले. पाय घसरून प्रज्वल हा खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी मेहकर येथील मेएसो महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. वऱ्हाड निघालय लंडनला या एकपात्री प्रयोगाचे त्यांनी पाचशेपेक्षा अधिक प्रयोग राज्यभर सादर केले आहेत. क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे त्यांनी हजारावर सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय काल रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले. प्रज्वलच्या मृतदेहावर मेहकर येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top