mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शेतकऱ्यास लुटणारा कृषी पर्यवेक्षक अडकला जाळ्यात : Agricultural supervisor who robbed farmer gets caught in a trap

शेअर करा :

Agricultural supervisor who robbed farmer gets caught in a trap : मलकापूर ते बोदवड मार्गावरील पिंपळगाव देवी फाट्यावर चार हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे यास एसीबीच्या पथकाने ९ फेब्रुवारीला रात्री आठ वाजता पकडले.

Agricultural supervisor who robbed farmer gets caught in a trap

पिंपळगाव देवी फाट्यावर एसीबीचा ट्रॅप यशस्वी
मलकापूर : शेतीत कबाडकष्ट उपसून संसाराचा गाडा हाकणारा शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात नियमित सापडतो. त्यातच लाचखोर अधिकारी, कर्मचारीही काही काम अडले तर आर्थिक लुबाडणूक करतात. मात्र, एका खमक्या शेतकऱ्याने मलकापूर तालुका कृषी कार्यालयातील एका भ्रष्ट, लाचखोर कृषी पर्यवेक्षकास चांगलीच अद्दल घडविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ फेब्रुवारीला रात्री आठ वाजेचा सुमारास मलकापूर ते बोदवड मार्गावरील पिंपळगाव देवी फाट्यावर चार हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे यास रंगेहात पकडले.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने तक्रारकर्त्या शेतकऱ्याने मळणीयंत्र खरेदी केले होते. यंत्राच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केल्याचा मोबदला म्हणून कृषी पर्यवेक्षक सावकारे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. हक्काचे पैसे गुन्हेगारास देणे मान्य नसल्याने शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. दरम्यान, ६ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. झालेल्या चर्चेनंतर सावकारे याने तडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली. त्यानुसार ९ फेब्रुवारीला मलकापूर ते बोदवड मार्गावर पिंपळगाव देवी फाट्यावर राधास्वामी सत्संगजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी पंचांसमक्ष चार हजार रुपये स्वीकारताना सावकारे याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे, लक्ष्मीकांत इंगळे, गजानन गाल्डे, रणजित व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीश शेटे यांच्या पथकाने हा ट्रॅप यशस्वी केला.

…………………

ADVT

🌟 त्वचेचे आणि दांता चे
आजारावर खात्रीशीर एकत्रित उपाय व काळजी – आता एका छताखाली!

डॉ. आंबेकर स्किन & श्रीशा डेंटल क्लिनिक

♦️🩺डॉ.प्रज्वल आंबेकर
MBBS,DDV (MUMBAI)
त्वचारोग, कुष्ठरोग, गुप्तरोग व सौंदर्य तज्ञ

♦️🩺डॉ.मयुरी आंबेकर BDS. MUHS(NASHIK)
दंतशल्य चिकित्सक
✨त्वचारोग व सौंदर्यवर्धनासाठी सुविधा:
💥👇👇👇👇👇👇👇💥
✅त्वचारोग – फंगल इन्फेक्शन , त्वचेवर पुरळ उठणे , लाल चट्टे पडणे
✅ केसांचे आजार – केस गळणे , टक्कल पडणे
✅ लेझर हेअर रिडक्शन ( नको असलेले केस काढणे साठी)
✅ हायड्रा फेशियल ( glow sathi)
✅ P.R.P. थेरपी ( केसगळती साठी )
✅ व्हायटीलिगो सर्जरी (पांढऱ्या डागांवर उपचार)
✅ डर्मा रोलर व केमिकल पिलिंग( pimples , काळे डाग , clean & clear skin साठी)
✅ रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट
✅ डर्माटोसर्जरी – तील , चामखीळ , कुरूप काढणे

🦷 दंत उपचार:
✅ डिजिटल X-ray
✅ दात साफ करणे (Scaling)
✅ रूट कॅनॉल ट्रीटमेंट
✅ दात काढणे व अक्कल दाढ काढणे
✅ दातांसारखे सिमेंट भरणे (Tooth-colored Filling)
✅ क्राऊन, ब्रिज व कवळी बसविणे
✅ वेडेवाकडे दात सरळ करणे (Ortho Treatment)
✅ लहान मुलांचे दंत उपचार


📍 पत्ता:
बस स्टँड जवळ, राणा गेस्ट हाऊसच्या बाजूला,
सुवर्ण गणेश मंदिरामागे, सुवर्ण नगर, बुलडाणा – 443001

📞 संपर्क: 8080334900

🕒 तुमच्या सौंदर्य आणि हसण्यावर आत्मविश्वास असू द्या – आजच भेट द्या!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top