mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण; ग्रामसेवकासह शिपायास नुकसानभरपाईची शिक्षा : Right to Information activist beaten up; Gram Sevak and constable sentenced to compensation

शेअर करा :

Right to Information activist beaten up; Gram Sevak and constable sentenced to compensation : मागितलेली माहिती न देता माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण केल्याप्रकरणी ग्रामसेवक व शिपायाला न्यायालयाने प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश दिले. तसेच एक वर्ष चांगली वर्तणूक ठेवण्याचा आदेश दिला. 

Right to Information activist beaten up; Gram Sevak and constable sentenced to compensation

चांगल्या वर्तणुकीचा वर्षाचा बॉण्ड
मेहकर : माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती न देता माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण केल्याप्रकरणी ग्रामसेवक व शिपायाला न्यायालयाने प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश दिले. तसेच एक वर्ष चांगली वर्तणूक ठेवण्याचा आदेश दिला.  मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र तांबे यांनी हा निर्णय दिला.
मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी येथील राजीव महादेव इंगळे यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी तक्रार दाखल केली होती. पिंपरी माळी येथे सिमेंट रस्ता व घरकुलांच्या बांधकामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, याबाबत माहिती अधिकारात ग्रामपंचायतला माहिती मागितली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर ग्रामसेवक भगवान काळे व शिपाई संतोष इंगळे यांनी लाठ्याकाठ्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. वर्षानंतर या घटनेचा निकाल आज लागला.

याप्रकरणी सरकारी वकील संतोष खत्री यांनी युक्तिवाद केला. कलम ३२३ नुसार गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र तांबे यांनी भगवान काळे व संतोष इंगळे या आरोपींनी प्रत्येकी साडेसात हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला.

……………..

ADVT

*बुलढाण्यात PAHEL Institute कडून NEET–CET सोबत JEE (Mains & Advanced) साठी एकत्रित स्मार्ट तयारी*

बुलढाणा :
Doctor किंवा Engineer बनायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुलढाण्यातील PAHEL Institute ने एक मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली आहे. आता NEET, MHT-CET सोबतच JEE Mains व Advanced साठीची संपूर्ण आणि स्मार्ट तयारी एकाच ठिकाणी PAHEL Institute मध्ये करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे *Avanti Learning’s, Mumbai येथील Expert IITian Faculties* यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना Concept-based Teaching सोबत Exam-oriented Practice दिली जाणार आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, वैयक्तिक लक्ष, शिस्तबद्ध अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण चाचण्या यामुळे PAHEL Institute ने यापूर्वीही उल्लेखनीय निकालांची परंपरा निर्माण केली आहे.

संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवणे हे PAHEL Institute चे ध्येय आहे.”

मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

PAHEL Institute – Learn & Lead
📍 चैतन्यवाडी, बुलढाणा
📞 97630 09156 |
97669 24900

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top