mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पोलिस शिपाई होणार तपास अधिकारी : Police constable to become investigation officer

शेअर करा :

Police constable to become investigation officer : पोलिस दलात सात वर्षे सेवा केलेल्या व पदवीधर शिक्षण घेतलेल्या नाईक पोलिस शिपाई व पोलिस शिपाई या अमलदारांना आता तपासाचे अधिकार देण्यात आले आहेत. तपासी अधिकाऱ्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्यातील विविध पोलिस ठाण्यातील अमलदारांना सहा प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले आहे.

Police constable to become investigation officer

राज्यभरातील पात्र कर्मचाऱ्यांना महिनाभराचे प्रशिक्षण 
शरद माळोदे 
बुलढाणा : पोलिस दलात सात वर्षे सेवा केलेल्या व पदवीधर शिक्षण घेतलेल्या नाईक पोलिस शिपाई व पोलिस शिपाई या अमलदारांना आता तपासाचे अधिकार देण्यात आले आहेत. तपासी अधिकाऱ्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्यातील विविध पोलिस ठाण्यातील अमलदारांना सहा प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले आहे.
बुलढाण्यासह काही जिल्ह्यांमधील नाईक पोलिस शिपाई व पोलिस शिपायांचे ट्रेनिंग लातूर येथील प्रशिक्षण केंद्रात सुरू झाले आहे. तसेच अन्य पाच ठिकाणच्या केंद्रात राज्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जात आहे. २७ जानेवारी ते २३ फेब्रुवारी असे चार आठवड्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
पोलिस महासंचालकांनी या प्रशिक्षणासंदर्भात पोलिस अधीक्षकांना पत्र पाठविल्यानंतर पात्र पोलिस अंमलदाराची यादी संबंधित केंद्रांना पाठविण्यात आली. त्यानुसार प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. पोलिस शिपाई हा कुठल्याही गुन्ह्याच्या तपासात सक्रिय सहभागी असतो. वरिष्ठांचे आदेश आणि सूचनांनुसार कर्मचाऱ्यांचे तपास काम चालू असते. मात्र, तपासात कर्तबगारी दाखविल्यानंतरही त्याच्या नावावर तपासाची मोहोर उमटत नाही. आता मात्र वरिष्ठस्तरावरून झालेल्या निर्णयामुळे पोलिस अमलदार तपासी अंमलदार म्हणून स्वतः तपास पूर्ण करतील आणि त्यांच्याच नावाने तपास प्रक्रिया नोंदविली जाणार आहे. या निर्णयामुळे सामान्य पोलिस शिपायांना शाब्बासकी मिळविण्याची ही मोठी संधी मिळाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन आणि शाखांमध्ये कार्यरत शंभर पोलिस कर्मचाऱ्यांचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण होत आले आहे. प्रशिक्षण व खास पथकेचे अप्पर पोलिस महासंचालकांच्या पत्रानुसार पोलिस मुख्यालयात जमा असलेल्या अग्रीममधून प्रति प्रशिक्षणार्थी अडीच हजार रुपये मेस ॲडव्हान्स म्हणून प्रशिक्षण केंद्राला पाठविण्यात आले आहे.
उत्तीर्ण न होणारे गमावतील संधी
प्रशिक्षणानंतर परीक्षा घेतली जाणार आहे. जे प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना तपासाचे अधिकार दिले जाणार नाहीत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना अभ्यासही करावा लागणार आहे.
चौकशीच्या फेऱ्यातील अंमलदार दूर
ज्या पोलिस अमलदाराविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित आहे, अथवा प्रलंबित आहे अशांना या प्रशिक्षणातून वगळण्यात आले आहे. चौकशीच्या कचाट्यात अडकलेल्यांनी तपासी अंमलदार होण्याची संधी तूर्त गमावली आहे.
(बातमीतील फोटो संग्रहित वापरला आहे )
……………………………………..
ADVT
Police constable to become investigation officer

बुलढाण्यात PAHEL Institute कडून NEET–CET सोबत JEE (Mains & Advanced) साठी एकत्रित स्मार्ट तयारी

बुलढाणा : Doctor किंवा Engineer बनायचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुलढाण्यातील PAHEL Institute ने एक मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली आहे. आता NEET, MHT-CET सोबतच JEE Mains व Advanced साठीची संपूर्ण आणि स्मार्ट तयारी एकाच ठिकाणी PAHEL Institute मध्ये करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे Avanti Learning’s, Mumbai येथील Expert IITian Faculties यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना Concept-based Teaching सोबत Exam-oriented Practice दिली जाणार आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, वैयक्तिक लक्ष, शिस्तबद्ध अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण चाचण्या यामुळे PAHEL Institute ने यापूर्वीही उल्लेखनीय निकालांची परंपरा निर्माण केली आहे.

संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवणे हे PAHEL Institute चे ध्येय आहे.”

मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

PAHEL Institute – Learn & Lead
📍 चैतन्यवाडी, बुलढाणा
📞 97630 09156 | 97669 24900

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top