mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिखली मतदारसंघातील रायपूर सर्कलमधील कांग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश :Congress office bearers from Raipur circle in Chikhali constituency join BJP:

शेअर करा :
  • Congress office bearers from Raipur circle in Chikhali constituency join BJP: प्रामाणिक जनसेवेच्या बळावर भारतीय जनता पक्ष खरोखर जनतेचा पक्ष म्हणून काम करत असल्यामुळे चिखली मतदारसंघातील रायपूर सर्कल सैलानी, भडगाव व रायपूर परिसरातील अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

Congress office bearers from Raipur circle in Chikhali constituency join BJP:बुलढाणा: भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे विकासात्मक धोरण, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, राज्याचे महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या हस्ते व मा.आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा आज मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात संपन्न झाला.

या वेळी रायपूर सर्कल सैलानी येथील शेख चांद मुजावर (माजी पंचायत समिती सदस्य), शेख असलम मुजावर (ग्रामपंचायत सदस्य), शेख इरफान मुजावर, शेख नईम मुजावर, शेख रिजवान, शेख शहजाद मुजावर, शेख फिरोज मुजावर, शेख हुजफ मुजावर व शेख शोएब मुजावर (शेरू) यांनी पक्षप्रवेश केला. भडगाव येथील श्री. किशोर संतोषराव साखरे पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), श्री. प्रकाश शांतीराम खडके (ग्रामपंचायत सदस्य) तसेच रायपूर येथील मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर, मोहम्मद साबीर मोहम्मद उस्मान (माजी सरपंच), शेख भिकन शेख बबलू, सलीम खान हसन खान, शेख कयूम शेख बुडन व मोहम्मद मुशरथ मोहम्मद एजाज यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्यात व केंद्रात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दिसून येत असून त्याचाच परिणाम म्हणून विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरू आहेत. चिखली मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे स्थानिक स्तरावरही पक्षाची ताकद वाढत आहे.

Congress office bearers from Raipur circle in Chikhali constituency join BJP:

या वेळी भाजपा नेते श्री. शंकर पाटील तरमळे, पिंपळगाव सराईचे सरपंच श्री. केशव पाटील तरमळे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. संदीप पाटील उगले, माजी सरपंच श्री. गणेश पाटील साखरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. दत्ता पाटील शेवाळे आणि श्री. मंगेश तरमळे उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top